जाखापुर (ता.कवठेमहांकाळ)येथे माजी सैनिकांचा जनजागृती संवाद वारी मेळावा संपन्न झाला.

Admin
0


सांगली न्यूज जाखापुर (ता.कवठेमहांकाळ)येथे माजी सैनिकांचा जनजागृती संवाद वारी मेळावा संपन्न झाला.

भारतीय जवान किसान पार्टीचे लोकसभेचे उमेदवार पांडुरंग भोसले यांच्या प्रचारार्थ हा संवाद वारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी जाखापूर येथील वीर चक्र विजेते बाबुराव संतू माळी यांच्या स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.उपस्थितांनी त्यांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेतला.यानंतर बोलताना लोकसभेचे उमेदवार पांडुरंग भोसले म्हणाले ज्यांच्यामुळे मातृभूमी सुरक्षित आहे.ते सर्वोच्च सुरक्षा क्षेत्रातील पुरस्कार विजेते असून त्यांचं नाव पण कुठे दिसत नाही, ना त्यांच्या स्मारकास  पुरेशी जागा मिळते. हे मोठे दुर्भाग्य आहे.हे दुःख होत आहे.मीडिया वरती चर्चा फक्त जनतेला झुलवायचं व जनतेला भ्रमित करायचं व घराणेशाहीला खत पाणी घालायचं काम प्रसारमाध्यमांमध्ये चालते की काय हा प्रश्न निर्माण होतो.सुरक्षा क्षेत्रातील सर्वोच्च शौर्याचे पुरस्कार महावीर चक्र, वीर चक्र यांचे लोकप्रतिनिधी उल्लेख करत नाहीत.फक्त निवडणुकीपुरते मतदाना साठी सैनिक दिसतात की काय असा प्रश्न पुढे येतो. 
कष्टकऱ्यांना,सैनिकांना,शेतकऱ्यांना,जर का न्याय देऊ शकत नसतील तर न्याय देणारे बनवूया.देशांमध्ये नवीन परिवर्तनाची लाट आणूया.त्या लाटेमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही वाहून जाऊन दे.भ्रष्टाचार मुक्त भारत घडून दे.शेतीप्रधान देशांमध्ये जगाचा पोशिंदा आत्महत्या केला नसला पाहिजे.शेतकऱ्याछा मुलगा सेनेत असतो.त्याच शेतकऱ्याला,सैनिकाला लोकसभेमध्ये उभे करू या.भ्रष्टाचाराला आळा घालून
शेतकरी राजा खऱ्या अर्थाने राजा राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया असे मनोगत व्यक्त केले. जनजागृती सैनिक संवाद वारी मध्ये कले.या. सभेचे सगळे नियोजन मेजर सागर बाबर यांनी केले ,यावेळी
 सैनिक समन्वय समितीचे अरविंद शिंदे,ज्योतीराम जाधव,अर्जुन लीगले,नंदकुमार पांढरे,सतीश पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. सैनिक चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विकास पाटील, विठ्ठल पाटील,हनुमंत गुरव,धनाजी पाटील,एकनाथ बाबर,सुभेदार पुंडलिक बाबर  ,वसंत शिंदे,उपस्थित सर्व आजी  माजी सैनिक व शेतकऱ्यांनी भारतीय जवान किसान पार्टीला पूर्णपणे पाठिंबा राहील.तसेच गाव व परिसरातील सगे सोयरे यांचा पूर्णपणे पाठिंबा राहील. अशी सर्वांनी ग्वाही दिली.सागर बाबर यांनी  आभार मानले..
 फोटो ओळी 
 जाखापूर येथील वीर चक्र विजेते बाबुराव माळी यांच्या स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top