तिसंगीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Admin
0


सांगली न्यूज 

घाटनांद्रे/वार्ताहर :- तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने युवा नेते दिलीप कांबळे यांनी दिली.यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचेही आयोजन केले असून.याचा स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही मंडळाच्या वतीने त्यांनी केले.
    याबाबत बोलताना ते म्हणाले की शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सिध्देश्वर हायस्कूल तिसंगी येथे लहान व मोठ्या गटासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजित केले आहे.तर रविवार दिनांक १४ रोजी सकाळी ७ वाजता सामुहिक बुद्ध वंदना होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.तर सकाळी आठ वाजता लहान व मोठ्या गटासाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व शिल्ड देवून गौरविण्यात येणार आहे.तर कार्यक्रमाची सांगता सायंकाळी ५ वाजता स्नेह भोजनाने होणार आहे.तरी याचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top