व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष पदी मुकेश बनसोडे व उपाध्यक्ष पदी तानाजी शिंगाडे

Admin
0


सांगली न्यूज 

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या कवठेमहांकाळ तालुका अध्यक्षपदी दैनिक बंधुताचे पत्रकार मुकेश बनसोडे तर उपाध्यक्ष पदी दैनिक जनमतचे पत्रकार तानाजी शिंगाडे व क्रांती न्यूज चे संपादक अमित कांबळे यांची एक मताने निवड



सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली.
यावेळी कवठेमहांकाळ तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, जिल्हा संघटक अल्ताफ खतीब यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.यावेळी तालुक्याची कार्यकारणी निश्चित करण्यात आली. ही कार्यकारणी पुढीलप्रमाणे दै,बंधुताचे पत्रकार मुकेश बनसोडे,,(तालुकाध्यक्ष)दै.जनमत व एस.के.न्यूजचे कवठेमहांकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे व क्रांती न्यूजचे संपादक अमित कांबळे यांची उपाध्यक्षपदी दै.सकाळचे एच.बी.तांबोळी व विशाल वाघमारे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.भारत माझाचे संपादक प्रवीण लोंढे यांची खजिनदार,दै.जनमत कुची प्रतिनिधी व अर्थ राज्य न्यूज चॅनेलचे कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट यांची कार्यवाहक म्हणून निवड करण्यात आली. दै.जनप्रवास (ढालगाव)प्रतिनिधी गुंडा झुरे यांची संघटक व महाकांली न्यूज चॅनेलचे पत्रकार चंद्रकांत जगताप कार्याध्यक्षपदी,शेतकरी न्यूजचे संपादक श्रीकृष्ण माळी यांची प्रसिद्धीप्रमुख,तर महांकाली न्यूजचे संपादक लक्ष्मण सनगर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सर्वांची निवड एकमताने करण्यात आली.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या पत्रकार संघटनेला व्यापक असे रूप यावे वाइस ऑफ मिडिया या संघटनेच्या माध्यमातून पत्रकाराच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत, पत्रकारांनी प्रमाणिक पत्रकारिता करावी, पत्रकारितेकडे व्यवसायिक स्वरूपाचे माध्यम म्हणून न पाहता छंद व समाजाच्या हितासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून पत्रकारिता करावी पत्रकार संघ वाढी साठी आपली या पुढील दिशा कशी असेल यावर अनेकांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. या नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सचिन मोहिते यांच्या हस्ते यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार लक्ष्मण सनगर, पत्रकार प्रविण लोंढे, अमित कांबळे, जगन्नाथ सकट आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडला.
यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top