तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील योगेवाडी MIDC अखेर मंजूर

Admin
0
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील योगेवाडी MIDC अखेर मंजूर.                       

       सांगली न्यूज 

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी स्व. आबांनी प्रस्तावित केलेली एमआयडीसी आमदार सुमनताई आर आर पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आली आहे. योगेवाडी हद्दीतील जागेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून लवकरच पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी, वीज) निर्माण करून नामांकित कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या माध्यमातून रोजगार व इतर अनेक व्यवसाय तयार होणार असून मतदारसंघाच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.


आबांच्या पश्चात त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली व मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने दिली त्याबद्दल आभारी आहे. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत साहेब व माजी राज्य उद्योग मंत्री अदिती ताई तटकरे यांचे देखील सहकार्य या प्रक्रियेमध्ये मिळाला त्याबद्दल मतदारसंघाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top