सांगली लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचां उमेदवार अर्ज दाखल

Admin
0



सांगली न्यूज 

सांगली लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार अर्ज आज एकदम साध्या पद्धतीने दाखल करण्यात आलेला आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करत बहुजन समाज पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे झोन प्रभारी सुदीप गायकवाड, जिल्हाध्यक्ष डॉ.शंकरदादा माने, जिल्हा प्रभारी दत्तात्रय बामणे, लहरीदास कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष गीताताई भंडारे, विधानसभा अध्यक्ष मन्सूर आत्तार, प्रशांत कांबळे, विशाल कांबळे, शुभम चव्हाण, वैभव शिंदे, राखी शिंदे, शुभम पाटील, सुनील खोत, संजय संधी, सिद्धार्थ रणपिसे, हर्षद मनेर, आदी उपस्थित होते बहुजन समाज पार्टीचे उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी माजी उमेदवारी ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लेकराची उमेदवारी आहे आणि प्रस्थापित पार्ट्यांनी आमदार खासदार मुख्यमंत्री असलेल्या घराणे शाही चालवण्यासाठी दिलेली उमेदवारी आहे गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम फक्त गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगाच करू शकतो आणि त्यासाठी लोक मला खासदार बनवतील असे मत व्यक्त केले आहे जिल्हाध्यक्ष डॉ.शंकरदादा माने हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की बहुजन समाजातील तरुणांना कोणतीही पार्टी संधी देत नाही म्हणून बहुजन समाज पार्टीच्या परम आदरणीय बहन कुमारी मायावती यांनी ओबीसी बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सांगली लोकसभा उमेदवारी एका सर्वसामान्य बहुजन मुस्लिम समाजातील तरुणाला उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी 85% लोकांची उमेदवारी आहे लोक या उमेदवाराला नक्की निवडून देणार विरोधात असलेल्या श्रीमंत,दांडगे, प्रस्थापित,कारखानदार, मोठे व्यापारी, 15% लोकांचा पराभव निश्चित आहे सर्वसामान्य गोरगरीब लोकांची संख्या 85% आहे आणि हे लोक अत्यंत कंटाळलेली आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेले आहेत सुशिक्षित, बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगाराचा, खासदार बहुजन समाज पार्टीतून निवडून येईल  असे मनोगत व्यक्त करून उमेदवार टिपू सुलतान यांना शुभेच्छा देऊन निवडणूक निर्णय अधिकारी दयानिधी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top