जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे इयत्ता पहिलीत दाखल मुलांच्या मेळावा क्रमांक एकचे आयोजन करण्यात आले होते.

Admin
0



सांगली न्यूज 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग रामचंद्र जाधव यांनी केले. यावेळी इयत्ता पहिलीसाठी दाखल झालेली सर्व मुले उपस्थित होती. त्या सर्व मुलांना पहिले पाऊल हे पुस्तक देण्यात आले. त्यांच्याकडून भाषिक कौशल्य, गणन क्रिया, बौद्धिक कौशल्य, शारीरिक कौशल्य अशी विविध कौशल्य यावेळी तपासण्यात आली. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व शाळा सुरू होईपर्यंत शाळा पूर्व तयारी कशी घ्यावी, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली दाखल झालेल्या सर्व मुलांचे पालक उपस्थित होते. यामध्ये वजन, उंची, प्राणी, पक्षी ओळख, स्वतःचे नाव सांगणे, वस्तू मोजणे, आकार ओळखणे, रंगांची नावे सांगणे, दोरी उड्या मारणे, बादलीमध्ये चेंडू टाकणे, कागदाला घड्या घालणे, यासारख्या विविध कृती घेण्यात आल्या. त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अशा पद्धतीने मेळावा क्रमांक एक चे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे करण्यात आले. यावेळी पहिलीत दाखल मुले, पालक, शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर, मुख्याध्यापक पांडुरंग रामचंद्र जाधव हे उपस्थित होते. आभार श्री राजू सुखदेव आटपाडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top